बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राकाँपाच्या अनेक नेत्यांचा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष मोईन जहीर काझी,मोताळा तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष गजानन मामलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज 29 ऑक्टोबर रोजी दुपारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बुलढाणा आ.संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.मुंबई येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला.