संगमनेर: पठार भागाला पाणी देणार तालुक्यातील साकुर पठार भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर
पठार भागाला पाणी देणार संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, पाणी योजनेच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी मार्ग काढला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी जांबुत येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात हा निधी दिला असून, पुढील टप्प्यातही भरघोस निधी दिला जाईल.