दारव्हा: मध्यरात्री कविता नगर मध्ये तहसिलदारांच्या घरात शिरले चोरटे; पण खाली हात गेलेत वापस!
दारव्हाशहरातील कविता नगर परिसरात मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. सेवानिवृत्त तहसिलदार श्री. चंद्रभान चिंतामण कोहरे यांच्या निवासस्थानी रात्री अंदाजे २ वाजता अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजाची पाटी कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपड्यांचे कपाट उघडून सामानाची तपासणी केली आणि घरभर फिरल्यानंतर निघून गेले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे कोणतेही मौल्यवान सामान चोरून नेले नसल्याने परिसरात चर्चेला पेव फुटले आहे.