जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना 10 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याच्या प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शनिवार दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8 वाजता नुतन वसाहत परिसरातील युवकांनी फटाके फोडून संतोष खांडेकर यांचा निषेध नोंदवला. नुतन वसाहत भागात युवक मोठ्या संख्येने एकत्र जमले. आयुक्त खांडेकर यांना अटक झाल्याने युवकांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हवे असे म्हटले.