गोरेगाव: आयटीआय रोड वार्ड क्रमांक 11 येथे 47 हजाराचा ऐवज लंपास, गोरेगाव पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
दि.9ते12 सप्टेंबरच्या रात्री 3 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान फिर्यादी दिलीपकुमार डोमंळे हे बाहेरगावी घराला कुलूप लावून गेले होते.कार्यक्रम आटोपून ते दि.12 सप्टें.च्या रात्री 8 वाजेच्या दरम्यान घरी परत आले असता घराच्या दाराला लावलेले कुलुपाची कुंडी तुटलेली दिसली.घराच्या आत जाऊन पाहिले असता त्यांनी ठेवलेला जुना सोना मंगळसूत्र किं.30 हजार,2अंगठी किं.7 हजार,गहू मणी 10 हजार एकूण 47 हजार रुपयांचा सोना दिसून आला नाही. कोणीतरी अज्ञात चोरांने चोरी करून नेल्याने तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले