वर्धा: वर्धा शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भेट
Wardha, Wardha | Aug 2, 2025 वर्धा शहरातील विविध व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्या, मागण्यासंदर्भात निवेदन दिले. व्यापाऱ्यांच्या मागण्या रास्त असून लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी दिले.