पाण्यात कोणीतरी पडले अशी बातमी माजी आमदार उदय सिंग राजपूत यांच्या कानी पडताच त्यांनी थेट वाहत्या पाण्यात मारली उडी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 30, 2025
आज दिनांक 30 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे पुराच्या पाण्यात मदन राठोड हा व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली असून, त्याच्या शोधासाठी स्वतः माजी आमदार उदयसिंह राजपूत पाण्यात उतरले. घटनास्थळी उपस्थित लोक बघ्याची भूमिका घेत असताना राजपूत यांनी धाडस दाखवत थेट पाण्यात उडी घेऊन शोधकार्य सुरू केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.