महाड: रायगड दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक दुध डेरी सभागृह पेज़ारी येथे संपन्न
Mahad, Raigad | Sep 14, 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवडा" अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत आज दुपारी २ च्या सुमारास रायगड दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक दुध डेरी सभागृह पेज़ारी येथे घेण्यात आली. यावेळी आमदार सुनील राणे यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस खासदार धैर्यशील पाटील, जिल्हायक्ष रायगड दक्षिण जिल्हा, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील उपस्थित होते.