कन्नड: मुसळधार पावसाने पिशोर झाला ओलाचिंब! खडकी नदीच्या पुराने नागरी वस्तीत हाहाकार
पिशोर परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नदीला आलेल्या पूराचे पाणी नागरी वस्तीत घुसले. या पाण्यामुळे अनेक घरांत फर्निचर, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू व कपड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना घरातील साहित्य बाहेर काढण्याचीही संधी मिळाली नाही. परिणामी सर्व सामान पाण्यात भिजून गेले. लहान मुले, महिला व वृद्धांना रात्रभर जागून सुरक्षित स्थळी थांबावे लागले.