तेलकामठीत श्री नारायण देव महापूजा (बिज) उत्सव भक्तिभावात साजरा तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गिरीश आंदे तेलकामठी येथील बाजार चौक परिसरात श्री नारायण देव महापूजा (बिज) उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. मंगळवार दि. २० जानेवारी २०२६ ते गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेप