बार्शी: वैरागमध्ये रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तीकडून पथदिव्यांची तोडफोड
Barshi, Solapur | Sep 15, 2025 वैराग शहराला उजळणारे पथदिवे अचानक बंद पडल्याने शहर अंधारात बुडाले आहे. १० सप्टेंबर रोजी पहाटे ही बाब नगरपंचायतीच्या लक्षात आली. अज्ञात व्यक्तीने बार्शी-सोलापूर रस्त्यावरील दुभाजकांवरील पथदिव्यांचे पॅनल बॉक्स फोडून एमसीबी आणि इतर इलेक्ट्रिक साहित्याची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात १४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.