मेहकर: नांद्रा धांडे येथे राष्ट्रीय लोककलावंत संघर्ष समितीची शाखा स्थापन
लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व संघर्ष करणारी एकमेव संघर्ष समिती म्हणजे राष्ट्रीय लोककलावंत ,दिव्यांग,निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य. या राज्यव्यापी संघर्ष समितीची शाखा नांद्रा धांडे तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी नांद्रा धांडे येथील सर्वच क्षेत्रातील कलावंत, दिव्यांग, यांनी पुढाकार घेऊन संघर्ष समितीची शाखा फलक लावून शाखेचे स्थापना केली. त्यावेळी उद्घाटक अरुण रायमुलकर, पोलीस पाटील मायाताई अवसरमोल, आदि.मान्यवरांनी केली.