आज रोजी दुपारी 2 च्या सुमारास समाज माध्यमावर भोकर ते किनवट मार्गांवर धावणाऱ्या एका ऑटोचा व्हीडिओ व्हायरल होताना दिसत असून ह्या ऑटोवर मागे उन्हे राहून म्हणण्यापेक्षा लटकून आपला जीव धोक्यात घालत प्रवासी प्रवास करून आहेत, याकडे पोलीस प्रशासनासह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पुढे येत आहे, चुकून एखादा अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे याकडे लक्ष देत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.