नेवासा: शेकडो शेतकरी अतिवृष्टी मदतीच्या प्रतिक्षेत
नेवासा तालुक्यातील चांदा, बऱ्हाणपूर, लोहारवाडी, कौठा, देडगाव परिसरातील शेकडो शेतकरी अजूनही अतिवृष्टी मदतीच्या प्रतिक्षेत असून आम्हाला मदत देणार का ? असा संतप्त सवाल या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. नेवासा तालुक्यातील या परिसरात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले होते. शासनाने मदत जाहीर केल्याने बळीराजाला समाधान वाटले होते.