मुखेड: बस स्थानक येथे बसमध्ये चढत असताना अज्ञाताने केले महिलेचे सोन्याचे दागिने गायब, मुखेड पोलिसांत गुन्हा नोंद
Mukhed, Nanded | Nov 2, 2025 दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास बस स्थानक मुखेड येथे उदगीरला जाण्यासाठी माधवराव बोडके व त्यांचे कुटुंबीय हे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पत्नीच्या हातातील पिशवीतील 65 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते, ह्या प्रकरणी फिर्यादी बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुखेड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गौटे हे करत आहेत.