लाखनी: वैरण आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला! किन्ही एकोडी परिसरातील घटना
वनक्षेत्रात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने केलेल्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शनिवारी वनपरिक्षेत्र लाखनी अंतर्गत उमरझरी बिट चांदोरी येथील नियत क्षेत्र कीन्ही/एकोडी परिसरात घडली. ब्रिजलाल शेगो हरिनखेडे (रा. कीन्ही/एकोडी, ता. साकोली) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजलाल हरिनखेडे हे दुपारच्या सुमारास आपल्या पाळीव जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी शेत परिसरातील वनभागात गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.