वडुले येथील शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या
नेवासा तालुक्यातील वडुले येथील एका शेतकऱ्याने राज्य शासनाला जबाबदार धरत आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबासाहेब सुभाष सरोदे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन स्वतःच्या शेतात आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी या शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून कर्जबाजारीपणा बद्दल आणि आपल्या आत्महत्येला राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.