कन्नड शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर व संख्या यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः सकाळी शाळा व क्लासेसला जाणाऱ्या मुला-मुली व त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यापूर्वी काही ठिकाणी मोकाट कुत्र्यांमुळे किरकोळ दुर्घटना घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख यांनी कन्नड नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कारवाईचा निर्णय घेतला.