आज दिनांक 26 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तहसील कार्यालय येथे सरपंच मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्र नारायण लोखंडे व विकास जाधव हे मागील 5 दिवसापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे, मात्र त्यांच्या या आमरण उपोषणाकडे प्रशासन व तहसीलदार दुर्लक्ष करत असल्यामुळे मंगेश साबळे यांनीही आगळे वेगळे आंदोलन करत प्रशासनाचे लक्षवेधी दिले आहे, व त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी सुद्धा यावी त्यांनी केली आहे.