नांदुरा: पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांवर कडक शासन करा:तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोकशाही प्रणालीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली या घटनेचा नांदुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. व यातील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक शासन करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन आज 22 सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.