उमरेड: इतवार पेठ येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Umred, Nagpur | Nov 5, 2025 उमरेड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आरोपी पंकज गौतम वय 31 वर्ष राहणार कानपूर हल्ली मुक्काम रेवतकर यांच्या घरी किरायाने हा अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे