उरण तालुक्यातील मोठे भोम गावात 9 नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत आढळलेल्या 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूनं परिसरात खळबळ उडवली आहे. प्राथमिक तपासात उरण पोलिसांनी हे स्पष्ट केलं की, हिराबाईंचा मृत्यू नैसर्गिक नसून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार हिराबाईंच्या शरिरावर टणक वस्तूने मारहाण केल्याचे चिन्ह स्पष्ट दिसून आले.