राजस्थानमधील सालासर येथे खाटू श्याम बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ११ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पारसे कुटुंब टवेरा गाडीने राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम बाबा मंदिराकडे दर्शनासाठी जात होते.