रावेर: निंभोरा येथे डाउन रोडवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला,निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद,ओळख पटवण्याचे आवाहन
Raver, Jalgaon | Dec 14, 2025 रावेर तालुक्यात निंभोरा हे गाव आहे. या गावाच्या डाउन रोडवर एक ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व सदर अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.