दिग्रस शहरातील भाजी मार्केट परिसरातून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी क्रमांक एमएच-२९ सीडी-०५४६ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी फिर्यादी गोपाल साहेबराव साळुंके (वय ३६, रा. इसापूर) यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहेत.