गोंदिया: मरारटोली बसस्थानकावर ऑटोने रोखला रस्ता,मरारटोली बस स्टेंड समोर घटना
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मरारटोली बस स्टेंड समोर गोंदिया येथे ४ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजता ऑटो क्रमांक एम.एच-३५, ए.एच.१७३४ हा ऑटो सार्वजनिक रोडवर उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. आरोपी सत्यम संजय कारोसिया (२८) रा. सिव्हील लाईन रेल्वे क्वाॅर्टर गोंदिया याच्यावर पोलीस हवालदार सुमेद चंद्रीकापुरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.