हिंगणघाट: तालुक्यात ठिकठिकाणी मिरवणूक काढून मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन:गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष
तालुक्यासह शहरात मोठ्या संख्येने भाविकांनी मस्कऱ्या गणपतीचे विराजमान केले होते.१० दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकाणी गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात भजनी मंडळीच्या उपस्थित मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत बापाचे विसर्जन केले.यावेळी ठिकठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.