मुर्तीजापूर: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती यांच्यावर भर न्यायालयात बूट फेक करणाऱ्यांवर एफ आय आर दाखल करा,डॉ.श्रीकांत तिडके
नुकतेच दिल्ली येथे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय बी.आर गवई साहेब यांच्यावर न्यायालयातच वकील असलेल्या व्यक्तीने सूडबुद्धीने बुट फेक करून भारतीय संविधानाचा अपमान केला आहे,भारताचे इतिहासातली ही पहिली घटना सून देशाला काळीमा फासणारी घटना आहे. सर्वोच्च न्यायालयावरच असे लज्जास्पद प्रसंग घडत असतील तर सामान्य अधिकाऱ्याचे काय असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे, अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी विविध संघटनेकडून निषेध व कठोर मागणीचे मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.