अर्जुनी मोरगाव: सरस्वती विद्यालयात सापांविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित
साप हा पर्यावरणातील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक असून त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा ओळखण्यात येते. स्थानिक सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. कैलास कापगते एक सर्पमित्र असून त्यांनी अनेक सापांना जीवनदान दिलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना सापांविषयी माहिती देऊन जनजागृती निर्माण करण्यात आली.