मावळ: सोमाटणे फाटा येथे वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत, दोघांना अटक
Mawal, Pune | Sep 16, 2025 वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना दोघांनी अरेरावी करत त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना रविवारी (१४ सप्टेंबर) रोजी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सोमाटणे फाटा शिरगाव रोडवर घडली.या प्रकरणात पोलीस कर्मचारी प्रशांत खेडकर (४२, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.