निमगुळ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शेतकरी आणि मजुरांसाठी जादूटोणाविरोधी कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. अंनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोस्टरद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. अज्ञान आणि अंधश्रद्धेवर आधारित अनिष्ट व अघोरी प्रथांपासून सामान्य लोकांचे संरक्षण करून, समाजात विवेकी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.