बार्शी: डोराळे गावात शेतकऱ्यांच्या घराजवळ कोसळली वीज; संसार मोडला
Barshi, Solapur | Sep 15, 2025 बार्शी तालुक्यातील ढोराळे गावात रात्री मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. याच पावसादरम्यान वीज कोसळून शेतकऱ्याच्या घराचं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. ढोराळे गावातील गट नंबर २४१ मध्ये शेतकरी तुकाराम दलगुडे यांनी शेतात राहण्यासाठी घर बांधले आहे. त्यांच्या घरावर वीज कोसळून संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. याबाबतची माहिती दलगुडे यांनी १५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दिली आहे.