महाड: सुतारवाडी गावी खासदार सुनील तटकरे यांनी कार्यालयात जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Mahad, Raigad | Sep 21, 2025 रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी आज दुपारी जिल्ह्यातील सुतारवाडी या गावी आपल्या कार्यालयात नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना या समस्या संदर्भात निराकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. जनतेशी संवाद या उपक्रमांतर्गत खासदार सुनील तटकरे यांनी जनतेच्या तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.