संग्रामपूर: तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम मदत मिळण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन
राज्य शासनाने नुकताच रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर १०,००० रुपये (कमाल ३ हेक्टर मर्यादा) आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याला समाविष्ट करण्यात आले नाही.सग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मदत देण्यात यावी यासाठी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन दिले आहे.