तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांच्या सोबत बैठक घेऊन, तालुका तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीबाबत जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर यांनी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर सर्व तालाठी, ग्रामसेवक आणि कृषि सहाय्यकांना तात्काळ पंचनामे करण्याचे संयुक्त आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना याबाबत जागृत करून, गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खरीप पिकाचे सरसकट पंचनामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.