औसा: हजार दिव्यांच्या प्रकाशात उजळले बुधोडा येथील महादेव मंदिर,त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जाधव परिवाराची अनोखी देव दिवाळी
Ausa, Latur | Nov 5, 2025 औसा -औसा तालुक्यातील बुधोडा गावात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी संध्याकाळी महादेव मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने दैदिप्यमान झाला. गावातील जाधव परिवाराने भक्तिभावाने 1000 दिवे लावून देव दिवाळी साजरी केली. प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातींचा समावेश असून सुमारे 2000 वातींनी हा प्रकाशोत्सव अधिक तेजोमय झाला.या अनोख्या उपक्रमामुळे महादेव मंदिर परिसरात अवर्णनीय वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र केवळ दिव्यांची लखलख आणि भक्तीभावाने भारलेले वातावरण दिसत होते.