गोंदिया: तिमेझरी येथे अवकाळीचा फटका, भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, सरसकट नुकसान भरपाई द्या --भाजप नेते आनंद पटले
तिमेझरी ग्राम.प.च्या वतीने गावातील शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करण्यात आली.सतत अतिवृष्ठीमुळे शेतातील मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला,अवकाळीने होत्याचे नव्हते केले.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.शासनाने लवकरात लवकर सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होईल. अशी मागणी भाजप नेते आनंद पटले, उपसरपंच भोजराज चौहान, सामाजिक कार्यकर्ते नीलकंठ बघेले,लीकेश रहांगडाले, चंद्रप्रकाश मरस्कोल्हे,टेकेश्वर भगत, भोजराज रंहागडाले होते