दि. 16 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने लातूर फाटा कडून दूध डेरी कडे एक हायवा टिप्पर रेती भरून येत असल्याची माहिती मिळवणे सदर चौकामध्ये हायवा क्र. MH-26-BD-4100 थांबवला होता, ज्यात 4 ब्रास रेती होती व अधिकची माहिती घेत रेती वाहतूक परवाना नसल्याने त्या विरुद्ध कारवाई करत हायवा व रेती असा मिळून 40,20,000 रु. चा मुद्देमाल जप्त करत गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती आजरोजी दुपारी 3 च्या देण्यात आली आहे.