नेवासा: कांद्याची आवक घटली, मात्र भावात इतकी वाढ !
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली असून कांद्याच्या भावात जास्तीत जास्त १०० रुपयांनी वाढ झाली. सोमवारी कांद्याची ६२ हजार ६१४ गोण्या आवक झाली. तर शनिवारच्या तुलनेत सोमवारी १२ हजार कांदा गोण्यांची आवक कमी झाली आहे. सोमवारी कांद्याला जास्तीत जास्त भाव १४०० रुपयांपर्यंत मिळाला.