एरंडोल तालुक्यात भातखेडा हे गाव आहे.या गावातील रहिवासी दीपक भागवत शार्दुल सुतार वय ३५ हा तरुण घराबाहेर दुचाकी लावत होता. दुचाकी उभी करत असताना अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मायेत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.