कराड: काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली महत्वाची जबाबदारी; निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी समिती स्थापन
Karad, Satara | Jul 6, 2025 राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून गैरमार्गाने विधानसभा निवडणुकीत यश मिळवत महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, ते वेळीच रोखले जावेत यासाठी काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांच्या समितीची स्थापना केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली माहिती रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रसारमाध्यमांना दिली.