पुणे शहर: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रो सायंकाळी ६ नंतर बंद
Pune City, Pune | Oct 20, 2025 दिवाळीनिमित्त मंगळवारी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजल्यानंतर मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच दोन्ही मार्गांवरील सेवा कार्यरत ठेवण्याचा निर्णय मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) घेतला आहे. बुधवार (२२ ऑक्टोबर) पासून रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार असल्याचे महामेट्रोने जाहीर केले.