पनवेल: पेट केअर सेंटरमध्ये श्र्वानाना केअर टेकरकडून मारहाण, कोपरखैरणे पोलिसांत गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 10, 2024 नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे एका पेट केअर सेंटरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेट केअर सेंटर मधील केअर टेकर तेथील श्वानांना हात, बुक्क्याने आणि पट्ट्याने निर्दयीपणे बेदम मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी पेट केअर सेंटरच्या मालकांनी केअर टेकर दिलीप साहू उर्फ ऋषी विरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी साहूविरोधात गुन्हा दखल केला आहे.