कोरेगाव: कोरेगावात महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; सराफ व्यावसायिक पती-पत्नीसह पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
कोरेगाव शहरात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर बुरूडगल्ली परिसरात दुकान गाळा मोकळा करण्याच्या कारणावरून एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ, विनयभंगाचा प्रयत्न आणि मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सराफ व्यावसायिक पती-पत्नीसह पाच जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत सोमवारी रात्री उशिरा दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनिषा राजेंद्र खरात (वय 42, रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) यांनी तक्रार दिली.