आज दिनांक 13 डिसेंबर 2025 शनिवार रोजी सायंकाळी 5वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी नागपूर येथे दीक्षाभूमीला आज भेट दिली आहे. त्या दीक्षाभूमी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला शांतीचा संदेश देणारा बुद्ध धर्म स्वीकारला या दीक्षाभूमी च्या चरणी आमदार नारायण कुचे यांनी नतमस्तक होत तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. याप्रसंगी बदनापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.