चाळीसगाव: चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम यांच्याकडून वार्षिक तपासणी
चाळीसगाव विभागाच्या माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम यांनी आज रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीसाठी भेट दिली. या तपासणीदरम्यान मॅडम यांनी पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला, तसेच अधिकारी व अंमलदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सकाळी पोलीस स्टेशन येथे आगमन होताच, पोलीस निरीक्षक श्री शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व अंमलदार यांनी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांना परेड मार्च करून सन्मानपूर्वक मानवंदना दिली