गणेश कॉलनी निवासी विजय रहांगडाले यांच्या घरासमोर त्यांनी उभा केलेल्या दुचाकीच्या डिक्की मध्ये चक्क साप आढळून आला. आज ते मुलांना शाळेत सोडायला निघत असताना त्यांना दुचाकीच्या डिक्की मधून आवाज ऐकू येऊ लागला त्यांनी डिक्कीचे झाकण उघडले तर त्यात कॅट स्नेक या प्रजातीचा तीन फूट लांब दिसला. त्यांनी लगेचच सर्पमित्र आकाश मेश्राम याला मोबाईलवर माहिती दिली आकाश व त्याचे साथीदार आकाश मंडळ यांनी या सापाला सुरक्षित बाहेर काढले.