सातारा: साताऱ्यात नगरपालिका निवडणुकीला सुरुवात; थंडीमुळे मतदान केंद्रांवर शांत वातावरण, राजपथावर टी स्टॉलवर किरकोळ वाद
Satara, Satara | Dec 2, 2025 सातारा शहरात नगरपालिका निवडणुकीसाठी आज दोन डिसेंबर रोजी (मंगळवार) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र शहरात पहाटेपासूनच वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे अनेक मतदार घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत असल्याने मतदानाच्या पहिल्या दोन तासांत केंद्रांवर अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. यादरम्यान राजपथावरील एका स्टॉलवर किरकोळ वाद झाला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला यावेळी बागेची गर्दी मोठी होती.नागरिकांनी साधारणपणे नेहमीपेक्षा हळूहळू मतदान केंद्रांकडे पावले वळवताना दिसत आहे.