बांगलादेश येथील हिंदू समाजातील बांधवांवर अन्याय अत्याचार व हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत असून या अमानुष घटनांमुळे हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची व दुःखाची भावना निर्माण झाली आहे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार यांना सोमवारी निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला तरी या निवेदनात ही बाब केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊन बांगलादेशातील हिंदूच्या संरक्षणासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलण्याची मागणी केली.