सुरगाणा: कोटंबी येथे दिवाळी निमित्त दिवाळी पाडवा पारंपारिक पद्धतीने करण्यात आला साजरा
Surgana, Nashik | Oct 22, 2025 आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी यशोदीप संस्थेच्या वतीने कोटंबी येथे दिवाळी पाडवा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी ठाकर नृत्यासह सांबळ , ढोलपावरी नृत्य सादर करण्यात आले. तसेच पारंपारिक वाद्य , खाद्यपदार्थ , रानभाज्या यांचे प्रदर्शन व माहिती देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.